Welcome to ज्ञानविश्व न्यूज़   Click to listen highlighted text! Welcome to ज्ञानविश्व न्यूज़
Uncategorized

स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने दिव्यांग विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप

स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने दिव्यांग विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप
नांदेड : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ८० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून वसंतनगर, नांदेड येथील कुंटूरकर निवासी दिव्यांग कार्यशाळेत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय गंगाधरराव कुंटूरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्तम कुंटूरकर होते, तर संस्थेच्या उपाध्यक्ष कल्पना कुंटूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते भारतमाता तसेच संस्थापक अध्यक्ष स्व. गंगाधरराव कुंटूरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासात आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, त्यांचा आत्मविश्वास व उत्साह वाढावा आणि शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने विद्यार्थ्यांना गणवेश तसेच आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे मुख्याध्यापक खंडागळे, वाडेकर, शुभम बिजमवार, गांजरे, पेडलवार, सौ. आरती भुरेवार, अजय कांबळे, तिरुपती गोदगे, इरफान अली, संगीता वाघमारे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या सांगतेवेळी मुख्याध्यापक खंडागळे यांनी स्वातंत्र्यदिनाचा सोहळा तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेला हा स्तुत्य उपक्रम शिस्तबद्ध आणि उत्साहात पार पडल्याबद्दल सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मान्यवर व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!